
राज्याचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे आणि त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गात अडथळे आहेत पण त्याने काही फरक पडलेला नाही, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. अडथळे आले तरी स्टेअरिंगवरची पकड सुटणार नाही असे वक्तव्य केले होते. यावरून विरोधकांकडून टीका करण्यात आली. मात्र याबाबत महाविकास आघाडीतच मंत्री असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकार चालविण्याच्या कौशल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या