
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज आपली अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली. या चाचणीत कोणताही दोष आढळून आला नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्विट करून दिली.
डॉक्टरांनी दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रति मी आपला आभारी आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
























































