महायुती सरकारने जाहिरातींसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार आणि जाहिराती जोरदार असा हल्लाबोलही केला आहे.
एक्सवर पोस्ट करून जयंत पाटील म्हणाले की, फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण, आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती, पण शेवटी महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार असेही पाटील म्हणाल्या.
फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला… pic.twitter.com/wrfbrNIe1y
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 9, 2024