एकनाथ खडसेंच्या पदाबाबत शरद पवारच निर्णय घेतील, जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यावर त्यांना कोणते पद द्यायचे याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच घेतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केले.

इतर पक्षाचे आमदार-खासदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आमदार-खासदारांना कधी प्रवेश द्यायचा याचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक
शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका होणार त्यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा झाली.या निवडणूकांबाबत शिवसेना तसेच काँग्रेससोबतही चर्चा होईल. एक-दोन दिवसा आपण स्वतŠ सुभाष देसाई तसेच बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेणार आहोत असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

अजित पवार यांची प्रकृती उत्तम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्दीचा त्रास होत असून त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.