हे भाजपला उशीरा सुचलेलं शहाणपण, जयंत पाटील यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पोटनिवडणूकीतून आज भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपने माघार घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपच्या उमेदवार माघार घेण्य़ाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ”अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे. महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.