बीड शहरातून जाणारा बारा कि.मी.चा चौपदरी रस्ता राष्ट्रीय महामार्गातूनच होणार

1033

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर बायपास झाल्याने बीड शहरातून गेलेला बारा कि.मी.अंतराचा पट्टा दुर्लक्षित राहिला. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूरवाडी ते आनंदवाडी दरम्यान जाणाऱ्या या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करावी असा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यात चौसाळा, गेवराई, बीड शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचा समावेश आहे. यासाठी 34 कोटी रूपयाxचा अंतिम डीपीआर प्रस्तावित आहे. त्यामुळे हे काम आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे बीड शहराजवळ बायपासने वळवण्यात आला. बायपास शहराबाहेरून गेल्यामुळे बीड शहरातून जाणाऱ्या या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. हा रस्ता राज्य सरकारकडे सुपुर्द केला असता तर त्याची रूंदी कमी करावी लागली असती. म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शहरातील वाहतूक आणि दळणवळणाची वाढती संख्या लक्षात घेऊन चौपदरीकरणाचा हट्ट कायम धरला त्यामुळेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने बिंदूरासरा नदीवरील पुलासाठी निधी उपलब्ध करून देत अद्ययावत पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाला जोडून असणाऱ्या बारा कि.मी.कोल्हारवाडी ते आनंदवाडी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे ठेवण्यात आल्याने या रस्त्यासाठी राज्य सरकार किंवा नगर पालिका खर्च करू शकत नाही. हा रस्ता केंद्र सरकारकडूनच मंजूर करून घ्यावा लागणार आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या पाठपुराव्यानंतर वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारा कि.मी.च्या या चौपदरीकरणासाठी मान्यता दिली. 100 कोटी रूपयाचे सविस्तर अंदाजपत्रक दाखल केले गेले. बीड प्रमाणे चौसाळा आणि गेवराई या शहरातून जाणाऱ्या रस्त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला. वन टाईम इम्प्लीमेंट धोरणानुसार केंद्र सरकार शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करून ते देखभालीसाठी राज्य सरकारकडे सुपुर्द करणार आहे. दरम्यानच्या काळात निवडणुका आणि सत्तांतर यामुळे शहरातील जाणाऱ्या चौपदरीकरणाच्या या रस्त्याचे काम ठप्प झाले होते. मात्र रस्त्यासाठी 34 कोटी रूपयाचा डीपीआर प्रस्तावित आहे . लवकरच हे काम मार्गी लागणार आहे. केंद्राकडे निधी नसल्यामुळे नविन प्रकल्पाला सध्या मंजुरी नाही म्हणून हे काम प्रलंबित ठेवण्यात आले होते. मात्र जयदत्त क्षीरसागरांनी तीन ते चार वेळा दिल्लीमध्ये जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे महत्व आणि गरज निदर्शनास आणून दिले. त्यातून गडकरी यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवत बारा कि.मी.च्या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्याचा शब्द दिला.

आपली प्रतिक्रिया द्या