
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या घरावर सोमवारी सकाळी हल्ला झाला. हल्ल्यात त्यांच्या खिडक्या तुटल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सिनसिनाटीच्या ईस्ट वॉलनट हिल्स परिसरातील विल्यम हॉवर्ड टाफ्ट ड्राइव्हवरील जे.डी. व्हान्स यांच्या निवासस्थानी घडली. सोमवारी रात्री १२:१५ वाजता अमेरिकेच्या गुप्तचर सेवेने पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली.
सध्या या घटनेबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही, परंतु पोलिसांनी संशयिताला अटक करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर ही घटना घडल्याने याबाबत चर्चा होत आहेत.




























































