आकाशाला स्पर्श करणार ‘ही’ जगातली सर्वात उंच इमारत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईमध्ये असणारी बुर्ज खलिफा ही इमारत सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीची उंची 828 मीटर इतकी आहे. परंतु येणाऱ्या पुढील वर्षात जगातील सर्वात उंच इमारत बाधंण्यात येणार आहे. ही इमारत बुर्ज खलिफा पेक्षा 600 फूट उंच असणार आहे. म्हणजे त्याची उंची 1000 मीटर पेक्षा जास्त असणार आहे. या इमारतीला जेद्दा टॉवर किंवा किंगडम टॉवर असे नाव देण्यात आले आहे. सौदी अरेबियातील रियाध येथे ही इमारत बाधंण्यात येत आहे.

या इमारतीची उंची ही बुर्ज खलिफाहुन 180 मीटरपासून 591 फुट उंच असणार आहे. ही इमारत बाधंण्यासाठी 8797 कोटी रुपये लागणार आहे. जेद्दा इकोनॉमिक कंपनीचे अध्यक्ष सौदी प्रिन्स अलवलीद बिन तलाल ते या इमारतीचे मालक आहे. जेद्दा टॉवरची डिजाइन सुप्रसिद्ध वास्तुकार एड्रियन स्मिथ व गॉर्डन गिल यांनी तयार केले आहे. जगातील 11 उंच इमारतींपैकी 4 इमारतीचे डिजाइन गॉर्डन गिल यांनी तयार केले आहे. त्याचबरोबर बुर्ज खलिफाचे ही डिजाइन गॉर्डन गिल यांनी केले आहे. या इमारतीला बांधण्यासाठी 2015 मध्ये जेद्दा इकोनॉमिक कंपनीने अलिन्मा इन्वेस्टमेंट केले व त्याचबरोबर वित्त करारसुद्धा केले.tower

काहींचा असा ही दावा आहे की, ही इमारत ढगांना ही स्पर्श करणार आहे. या इमारतीत 200 हून अधिक मजले असणार आहे. एका मजल्याचे क्षेत्रफळ 2.43 लाख चौरस मीटर, तर 2192 फूट उंच असणार आहे. या इमारतीत 55 सिंगल डेक लिफ्ट असणार आहेत, तर चार डबल डेक लिफ्ट असणार आहे. या इमारतीचे काम 10 जानेवारी 2015 ला सुरु करण्यात येणार आहे. आतापर्यंत 47 मजले तयार झाले आहेत. बेसमेंटपासून ते 92 मजल्यापर्यंत ऑफिस, पार्किंग व इतर गोष्टी असणार आहे. 115 व्या मजल्या पासून ते 156 व्या मजल्या पर्यत होटेल व रेस्टॉरेंट असणार आहे.