
विकेंडला आपण एखाद्या रेस्टाॅरंटमध्ये गेल्यावर, जीरा राईस किंवा डाल तडका या दोन डिश हमखास मागवतो. परंतु अनेकदा हाॅटेलपेक्षा ढाबा स्टाईल जीरा राईसची चव काही वेगळीच लागते. अशावेळी घरीच आपण जीरा राईस ही रेसिपी बनवू शकतो. ढाबा स्टाईल जीरा राईसची रेसिपी आता आपण घरच्या घरी करु शकतो.
ढाब्यावर जाऊन जीरा राईस खाण्यापेक्षा आता घरच्या घरी वेळ न दवडता जीरा राईस आपण घरच्या घरी बनवू शकतो. जीरा राईस बनवण्यासाठी, फक्त दहा मिनिटे लागतील. त्यामुळे आता ढाब्यावर जाण्यापेक्षा घरीच जीरा राईस खाण्याची मजा घेऊ शकता.
जीरा राईस रेसिपी
तांदूळ किमान दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर किमान 30 मिनिटे तांदूळ भिजत ठेवावे.
तांदूळ भिजत घातल्यानंतर, एका भांड्यात दीड कप पाणी उकळवत ठेवावे.
जिरा राईस करताना शक्यतो पसरट भांड्याचा वापर करावा. या पसरट भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालावे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार, तेल किंवा तूप घालावे. या तूपामध्ये नंतर निथळलेले तांदूळ घालावेत. हे तांदूळ थोडे परतून झाल्यानंतर, त्यामध्ये उकळत ठेवलेले पाणी घालावे. भात व्यवस्थित शिजवून घ्यावा.
हा भात थंड झाल्यावर, पसरवून ठेवावा.
त्यानंतर एका कढईत तेल/तूप गरम करावे. व्यवस्थित गरम झाल्यानंतर, त्यात तमालपत्र, लवंग, दालचीनी, काळीमीरी घालावी. नंतर सर्वात शेवटी जीरे घालावे. जीरे व्यवस्थित फुलल्यानंतर थंड झालेला भात घालावा. किमान पाच मिनिटे व्यवस्थित परतल्यानंतर, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
मस्त गरमगरम जीरा राईस डाल तडका तसेच कोकमकढी बरोबर खाण्यास अतिशय उत्तम लागतो.