
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
एकीकडे शांतीच्या गप्पा मारणार्या पाकड्यांनी दुसरीकडे आपले विखारी फूत्कार सोडून खरे रंग दाखविले आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला ‘जैश-ए-मोहम्मद’ने केलाच नाही असे निर्लज्जपणाचे वक्तव्य पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. ‘जैश’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही कुरेशी यांनी हे संतापजनक विधान केले. मसूद अजहरविरुद्ध हिंदुस्थानने पुरावे दिल्यास कारवाई करू, असे तुणतुणेही कुरेशी यांनी वाजवले.





























































