‘झनक’ फेम डॉली सोही हिचे निधन, बहिणीच्या मृत्यूनंतर काही तासांनी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरंजन क्षेत्रासाठी वाईट बातमी आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिचे निधन झाले आहे. त्या 48 वर्षांच्या होत्या. डॉली यांच्या  बहिणीचे गुरुवारी रात्री निधन झाले त्याला काही तास उलटत नाही तोपर्यंत डॉलीचे निधन झाले. एकाचवेळी दोन मुलींच्या निधनाने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

टेलिव्हिजन कलाकार डॉली सोही आणि अमनदीप सोही यांचे निधन झाले आहे. ‘झनक’ या टेलिव्हिजन मालिकेत सृष्टी मुखर्जीच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉलीने नुकतेच प्रकृतीच्या कारणाने हा शो सोडला होता. रिपोर्ट्सनुसार, डॉली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. डॉली सोही यांनी सर्व्हायकल कॅन्सर होता. याबाबत ईटाईम्स टिव्हीने माहिती शेअर केली होती. वृत्तानुसार, डॉलीच्या कुटुंबियांनी लिहीले की, आमच्या प्रिय डॉलीचे आज सकाळी निधन झाले आहे. अंतिम संस्कार आज दुपारी होणार आहेत. ही वेळ अभिनेत्रीच्या कुटुंबियांनसाठी फार कठिण काळ आहे. काही तासांच्या आत दोन्ही मुलींचे निधन झाले. अमनदीपही आपली बहिण डॉलीप्रमाणे अभिनेत्री होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉलीला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता उपचारानंतर तिच्या प्रकृतित सुधारणा होत होती. अखेर आज निधन झाले. प्रकृतीमुळे त्यांना झनक हा शोही सोडावा लागला होता. केमोथेरपीनंतर त्या जास्तवेळ शुटींग करु शकत नव्हती. डॉली आणि तिची बहिण अमनदीप या दोघींनाही नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . गुरुवारी अमनदीप आणि आज सकाळी डॉली यांचे निधन झाले. शुक्रवारी दुपारी डॉलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉलीने बराच काळ टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे. तिने एनआरआय अवनीत धनोवा याच्यासोबत लग्न केले होते. मात्र दोघांचेही पटत नसल्याने डॉली मुलगी एमिलीसोबत राहत होती. डॉली ‘भाभी’, ‘कलश’, ‘मेरी आशिकी तुम से ही’ आणि ‘खूब लडी मर्दानी झांसी की रानी’ सारख्या इतर टेलिव्हिजन शो केले. डॉलीची बहीण अमनदीपबद्दल सांगायचे तर, तिला काविळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काविळ वाढली आणि त्यांना किडनी फेल्युअरला सामोरे जावे लागले आणि तिचे निधन झाले.