
झारखंड विधानसभा निवडणूकीच्या सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. आजतक व एक्सिस माय इंडियाच्या एक्झिटपोल नुसार झारखंडमध्ये भाजप सरकारला धक्का बसण्याची शक्यता असून त्यांचे सरकार जाऊ शकते. तर काँग्रेस व झामुमोचे पारडे जड दिसत असून ते त्यांचे आकडे बहुमताकडे जाताना दिसत आहे.
आजतक व एक्सिस माय इंडियाच्या एक्झिटपोल नुसार, झारखंडमध्ये भाजपला 22-31 जागा, काँग्रेस-झामुमोला 38-50 जागा, जेवीएमला 2 ते 4 जागा, आजसूला 3-5 जागा व अन्यला 4-7 जागा मिळू शकतात. जर हे आकडे खरे ठरले तर भाजपच्या हातातून झारखंड हे आणखी एक राज्य निसटणार आहे. तर काँग्रेस व झामुमोचे सरकार अगदी सहजपणे बनू शकते अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

























































