Jio आपल्या ग्राहकांना देत आहे मोफत 10GB डेटा

7763

Reliance Jio  आपल्या ग्राहकांना 10 GB डेटा फ्री देत आहे. ग्राहकांना सलग पाच दिवस 2 GB डेटा मिळत आहे. एप्रिल महिन्यातही अशाच प्रकारे काही ग्राहकांना चार दिवसांसाठी दिवसाला 2 GB डेटा मिळत होता.

OnlyTech या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार Jio देशातील कुठल्याही ग्राहकाला 2 GB डेटा देत आहे. हा डेटा त्याने रिचार्ज केलेल्याच अतिरिक्त डेटा आहे. Jio सलग पाच दिवस 2 GB डेटा देत असल्याने एकूण डेटा 10 GB होत आहे. यात कुठलाही स्पेशल रिचार्ज नाही किंवा लकी ड्रॉ नाही. नशीबवान ग्राहकांना हा डेटा मिळत आहे. जर तुम्हालाही हा डेटा मिळाला की नाही हे तपासायचे असेल तर माय Jio  मध्ये जाऊन तुम्हाला डेटा बॅलेन्स चेक करावा लागेल.

Jio  ने यापूर्वी 99 चा रिचार्ज बंद केला आहे. Jio च्या वेबसाईटवरून आणि इतर ऍप्सवरूनही हा रिचार्ज हटवण्यात आला आहे. Jio चा मिनिमम रिचार्ज हा 149 रुपयांचा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या