जिओचा वर्षभर चालणारा सेलेब्रेशन प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वर्षभर चालणारा सेलेब्रेशन प्लॅन आणला आहे. त्यानुसार 2999 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना दररोज अडीच जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची असणार आहे. याशिवाय ग्राहकाला दिवसाला 100 एसएमएस मिळणार आहेत. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाऊडचे सबक्रिप्शन मिळणार आहे. जिओचे देशभरात 44 कोटी ग्राहक असून त्यांच्यासाठी सेलेब्रेशन प्लॅन पर्वणीच ठरणार आहे.