… ते केवळ शरद पवार या एका शब्दामुळेच , जितेंद्र आव्हाड यांची भावनिक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक ते अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांना जबर धक्का बसल्याने भर कार्यक्रमातच सर्वांना अश्रू अनावर झाले होते. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले.

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी रात्री देखील एक ट्विट करत शरद पवार यांना राजीनामा परत घेण्यास सांगितला आहे. ”पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले. आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार. साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.