अतिरेकी हल्ल्यात देऊळगावराजे येथील जवान शहीद

867

जम्मू-कश्मीरमध्ये लेह लडाख परिसरात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दौंड तालुक्यातील देऊळगावराजे गावातील जवान बाळासाहेब प्रल्हाद पळसकर यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. पळसकर हे आई-वडिलांना एकुलते एक होते.

त्यांचे आई-वडील गावाकडे राहतात, तर पत्नी आणि मुले पुण्यात वास्तव्यास आहेत.  बाळासाहेब यांचे पार्थिव रविवारी मूळगावी देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या