
जेएम फायनांशियल आणि हुरुन इंडियातर्फे ‘जेएम फायनांशियल हुरुन इंडिया अनलिस्टेड जेम्स 2026’ ही निवडक कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत हिंदुस्थानातील सर्वात सक्षम अशा 100 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. किमान 1 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या कंपन्यांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. यादीतील कंपन्यांचे गेल्या वर्षी एकूण उत्पन्न 8.9 लाख कोटी रुपये एवढे होते. या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 28.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. दोन वर्षांमध्ये त्यांनी 15.2 टक्के वाढ नोंदवली आहे.






























































