आंतरराष्ट्रीय जेएनपीटी वसाहतीत रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा

आंतराष्ट्रीय बंदर म्हणून ख्याती असलेल्या जेएनपीटी बंदराच्या कामगार वसाहतीत भर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे जेएनपीटी बंदरातील कामगार वसाहती मधील रहिवाशांना गेले अनेक दिवस पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तरी मुबलक पाणी मिळेल ही रहिवाशांची अपेक्षा होती. मात्र पावसाळ्यात देखिल या रहिवाश्यांना टँकरचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.

यामुळे नुकताच या वसाहती मधील महिलांनी पाणी टंचाईबदद्ल जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाला जाब विचारला असता. त्यानंतर पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जेएनपीटी बंदर प्रशासनाने घेतला आहे.

summary… jnpt people face water shortage