‘जेएनयू’ भेटीमुळे दीपिकाचे कोटय़वधींचे नुकसान, जाहिरात कंपन्यांनी फिरवली पाठ

1701
कुटुंबांला सांभाळणारी खंबीर स्वभावाची पिकू

मोठमोठय़ा ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून झळकणाऱ्या दीपिका पादुकोणचे जेएनयू भेटीमुळे कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जाहिरातींमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या दीपिकाकडे जाहिरात कंपन्यांनी पाठ फिरवली असून तिच्या जाहिरातींचे प्रसारण दोन आठवडय़ांसाठी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाचे जेएनयू प्रकरण शांत होऊपर्यंत तिच्या जाहिराती सध्या तरी प्रसारित होणार नाहीत.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण एका चित्रपटासाठी 10 कोटी तर जाहिरातीसाठी आठ कोटी रुपये इतके मानधन घेते. जेएनयूमध्ये काही बुरखाधाऱ्यांनी रॉड, साखळी आणि लाठय़ाकाठय़ांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यानंतर डाव्या पक्षाच्या समर्थक विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनाला दीपिकाने हजेरी लावली होती. यामुळे समाजातील एक वर्ग तिच्यावर नाराज झाला. या वादापासून जाहिरात कंपन्यांनीही दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय भूमिका घेणाऱ्या सेलिब्रेटींमुळे जाहिरातींना धोका

सेलिब्रेटींनी राजकीय भूमिका घेतल्याने प्रशासनाची नाराजी ओढवून घेण्याची भीती जाहिरात कंपन्यांना वाटत आहे. कोकाकोला, ऍमेझॉन आदी कंपन्याची जाहिरात करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितले, ‘सामान्यतः काही प्रमुख ब्रॅण्ड्स कोणत्याही वादात अडकण्याचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे भविष्यात विविध ब्रॅण्ड्स सेलिबेटींकडून राजकीय मताबाबत कॉन्ट्रक्टही करू शकतात.’

  • ब्रिटानिया गुड डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाईन्स, ऍक्सिस बँकसहित 23 ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत दीपिका आहे.
  • दीपिकाची एकूण संपत्ती 103 कोटींच्या घरात असून ट्विटरवर तिचे 2.68 कोटी फॉलोअर्स आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या