फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाच आरोपीना अटक: इंडियन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल १४ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच आरोपींना अटक करण्यात अहमदपूर पोलिसांना यश आले आहे.

औसा तालुक्यातील याकतपूर येथील रहिवाशी दत्तात्रय श्रीपती लखने यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. लखने हे २०१४-१५ मध्ये पुणे येथे कॉल सेंटरवर गाडी चालवण्याचे काम करत होते. मात्र त्यांना १४ लाखांना नोकरीचे आमिष दाखवल्याप्रकरणी २८ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फिर्यादीवरून पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाला गती देऊन पोलीस निरीक्षक विकास जाधव, सुहास बेंबडे, बी.आर.टारपे, त्रिभुवन प्रियंका यांना पोलीस पथकाने सापळा रचून कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दि. १४ फेब्रुवारी रोजी सपना एकनाथ गांजवे, ज्योती एकनाथ गांजवे, दत्तात्रय बाबुराव हजारे, मंगला दत्तात्रय हजारे, सुरज एकनाथ गांजवे या आरोपींच्या मुसक्या आवळून अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता. त्यांना १९ फेब्रुवारी पर्यंत पी सी आर मिळाला असून या प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे व पुणे शहरात त्यांनी अनेकांना गंडा लावल्याचे बोलले जात आहे.