
किरीट सोमय्या यांचा वादग्रस्त व्हिडीओ एका चॅनलवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. आज नांदेड शहर आणि जिल्ह्यात भर पावसात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 18 जुलै रोजी हिमायतनगर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी भर पावसाच्या पाण्यात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक सोशल मिडीयावर अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले.
नांदेड शहरात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयटीआय चौकात आज दुपारी असंख्य शिवसैनिक जमा झाले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. किरीट सोमय्या मुर्दाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, सोमय्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून शिवसैनिकांनी हा परिसर दणाणून सोडला. त्यामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हा संघटक नेताजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वत्सलाताई पुयड, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम, शहरप्रमुख गौरव कोटगिरे, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, तालुकाप्रमुख अशोक मोरे, उपतालुकाप्रमुख नवनाथ जोगदंड, विजय खामनकर, विजय बगाटे, माजी उपजिल्हाप्रमुख रवि हाटकर, मनोज काकडे, विजय चित्तेवार, मनोज धुताडे, तुकाराम पवार, लालचंद यादव, सोमनाथ जाधव, गणेश पेन्शलवार, किशोर ठाकूर, आमेर कुरेशी, तालुका संघटक गवळण येवले, शहर संघटक ललिताताई चिंचाळकर, उषा शिंदे, क्रांती पंडीत, मुक्ता लष्करे, मनिषा फुलारे, शिवकन्या फुलारे, ज्योती वाघमारे, कमल वाघमारे, पार्वती धबडगे, उषाताई राजाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
मुदखेड-भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित करताच महाराष्ट्रात जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्या निमित्ताने भाजप नेत्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून, एका लोकप्रतिनिधीने असे करणे लज्जास्पद याच निमित्ताने मुदखेड शहरातील उमरी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. किनवट- विरोधी पक्षाच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेचे वृत्त कळताच १८ जुलै रोजी किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने येथील जिजामाता चौकात तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून धिक्कार केला आहे.



























































