लग्नापूर्वी तरुणीशी ठेवले शारीरिक संबंध; विवाहास नकार देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका तरुणाने भावी वधूची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या तरुणाचा तरुणीशी विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यानंतर लग्नापूर्वी तरुणाने भावी वधूचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्या तरुणीशी विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणीने जोधपूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रातानाडा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नोव्हेंबर महिन्यात तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्या तरुणाशी आपले लग्न ठरले होते. त्याच्याशी साखरपुडाही झाला होता. त्यानंतर त्याने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न करण्यास नकार दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

दोन्ही कुटुंबांमध्ये दोघांच्या लग्नाबाबत बातचित सुरू होती. मात्र, तरुणीशी लग्न करणार नाही. या भूमिकेवर तरुण ठाम होता. त्यानंतर तरुणीने तरुणाविरोधात रातानाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणी आणि तरुणाचा साखरपुडा गेल्यावर्षी झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. या काळात तरुणाने भावी वधूचा विश्वास संपादन केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर 29 नोव्हेंबरला त्याने तरुणीला रातानाडा गेस्ट हाऊसमध्ये बोलावले. त्यानंतर त्याने प्रेमाची बतावणी करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. मात्र, लग्नाचा विष्य निघाल्यावर त्याने लग्नाला नकार देत तिच्याशी बोलणे बंद केले.

दोन्ही कुटुंबाच्या झालेल्या बैठकीतही त्याने लग्न करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात रातानाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरोधात कलम 376,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या