पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल रात्री उशिरा त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

संबंधित सहायक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्तालयात एका विभागात बसतात. त्यामुळे त्यांच्या स्टाफला आणि संपर्कात आलेल्याना क्वारटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या काही गुन्हेगारांची चौकशी सहायक पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याशिवाय कर्मचारीही त्यांच्याकडे कामासाठी येत होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस दलात आतापर्यंत 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 27 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 24 जणांवर उपचार सुरू आहेत. २ कर्मचाऱ्याना वीरमरण आले आहे.