गंमत म्हणून कामगाराच्या गुदद्वारात हवा सोडली, कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

टाईमपास म्हणून एका कामगाराच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरने हवा सोडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव असून त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. दहावीपर्यंत शिक्षण झालेला आदित्यच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने अतिग्रे इथल्या फाऊंड्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्याची ही नोकरी पहिली आणि शेवटची ठरली.

३ सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याच्या काही सेकंदातच आदित्य कोसळला होता. त्याची प्रकृत्ती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितले, यामुळे त्याला नागाळा पार्क येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. कोणताही त्रास नसलेला आदित्य अचानक बेशुद्ध कसा झाला याबाबत त्याच्या नातेवाईकांनी चौकशी करायला सुरुवात केली, यावेळी त्यांच्या हाती हे सीसीटीव्ही फुटेज लागलं. या सीसीटीव्हीमध्ये सुपरवाझरने त्याला बोलावलं आणि  प्रेशरने आदित्यच्या केसावर, कपड्यावर हवा मारत असताना चेष्टेने गुदद्वारात हवा सोडली. यामुळे आदित्य जागेवरच कोसळला होता. या घटनेनंतर सुपरवायझर गायब झाला आहे.