विम्बल्डन जिंकूनही रँकिंगमध्ये घसरण! कोर्टबाहेरील घटनांचा जोकोविचला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विम्बल्डन जिंकूनही पुरुषांच्या क्रमवारीतील नोवाक जोकोविचचे अव्वल पाचमधील जागतिक रँकिंग धोक्यात आहे. यामागे गेल्या काही महिन्यांमध्ये कोर्टबाहेर घडलेल्या अनेक घडामोडी कारणीभूत आहेत. कोरोना लसीच्या प्रकरणानंतर त्याला मेलबर्नमधून हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता आले नाही आणि त्याचे दोन हजार गुण कमी झाले. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीमध्ये राफेल नदालने त्याचा पराभव केला. तेव्हाही त्याचे गुण कमी झाले.

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा 3-6, 6-3, 6-4, 7-6 (3) असा पराभव करून सलग चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावले. बॉर्न बोर्ग, पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडरर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा चौथा पुरुष खेळाडू ठरला आहे. नोव्हाक जोकोविचकडे सध्या सहा हजार 770 गुण असून तो तिसऱया स्थानावर आहे.