जगप्रसिद्ध जोनाथनचा शो मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जगातील एक नंबरचा माइंड रीडर आणि इल्युजनिस्ट जोनाथन डेव्हीड बास हा न्यूयॉर्कहून काही दिवसांसाठी मुंबईत आला असून त्याच्या इल्युजनचे केवळ चार शो मुंबईत होणार आहेत. यातील पहिला शो ब्रिच कॅण्डी येथील सोफिया भाभा ऑडिटोरियममध्ये येत्या शनिवारी 22 सप्टेंबरला सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. हे शो जिजी सुबी आणि विशाल असरानी यांनी आयोजित केले आहेत. आपल्याला भविष्याबद्दल काय ठाऊक असते? कोण तुम्हाला काय भविष्य सांगतं? तुम्ही अंधाराला का घाबरता? तुमच्या मनातल्या जबर इच्छा काय आहेत? हे जाणून घेण्याचं सामर्थ्य असलेल्या जोनाथनचे हे चारही शो लाईव्ह असणार आहेत. त्यात तो हिपनॉटिजम, लेविटेशन यांच्यासोबतच चित्तथरारक स्टंट्सही रंगमंचावर सादर करणार आहे.