जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप; जोश्ना चिनाप्पाचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची अनुभवी खेळाडू जोश्ना चिनाप्पा हिचे जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपमधील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले आहे. इजिप्तच्या नूर इल शेरबिनी हिने जोश्ना चिनाप्पावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

इजिप्तची नूर इल शेरबिनी ही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून या स्पर्धेची गतविजेतीही आहे. नूर इल शेरबिनी हिने जोश्ना चिनाप्पावर 11-5, 11-3, 11-6 अशा फरकाने विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. जोश्ना चिनाप्पा हिला इजिप्तच्या खेळाडूविरुद्ध सलग दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.