भाजपचे अध्यक्ष नड्डा

290
New Delhi: Union Home Minister and outgoing BJP President Amit Shah greets party leader J P Nadda (2nd R) after he was elected as the next national President of the party, in New Delhi, Monday, Jan. 20, 2020. Organisation Poll process incharge Radha Mohan Singh (2nd R) is also seen. (PTI Photo/Arun Sharma) (PTI1_20_2020_000113B) *** Local Caption ***

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे निवडणूक प्रभारी राजनाथ सिंह यांनी अध्यक्षपदासाठी नड्डा यांचे नाव सुचविले. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जे. पी. नड्डा हे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. आता नड्डा हे भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. मूळचे हिमाचल प्रदेशचे आणि बिहारमध्ये जन्मलेले जे. पी. नड्डा हे विद्यार्थीदशेत अभाविपमध्ये सक्रीय होते. 1993 मध्ये ते पहिल्यांदा हिमाचल प्रदेशात आमदार झाले. चारवेळा ते आमदार होते. 1994 ते 98 या काळात ते हिमाचलप्रदेश भाजपच्या विधिमंडळात नेते होते. 2008 मध्ये प्रेमकुमार घुमल सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते. 2010 मध्ये नड्डा यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. ते पक्षाचे सरचिटणीस बनले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकार पुन्हा आले. अध्यक्ष अमित शहा गृहमंत्री बनले. त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा नड्डा यांनी दिला आणि ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते.

आपली प्रतिक्रिया द्या