VIDEO: कल्याणचा पत्री पूल पाडण्यास सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

कल्याणमध्ये मध्य रेल्वेवरील ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या पत्रीपूलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बोब्लॉक घेतला आहे. या काळात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीला सोमोरे जावे लागणार आहे. तसेच यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण पडणार आहे. नागरिकांच्या सोईसाठी सकाळपासूनच वाहतूक पोलीस, शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहनयंत्रणा सज्ज आहे.

पत्रीपूलाच्या पाडकामासाठी 70 अधिकारी, 450 कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच अनेक मोठ्या क्रेन आणि अद्ययावत यंत्रसामग्री दोन दिवसांपुर्वीच आणली आहे. पत्रीपूलाच्या पाडकामासाठी परिसरातील मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.