
हिंदुस्थानच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत 2-2 (4-2) असा पराभव करीत युरोप दौऱयाचा श्रीगणेशा केला. उपकर्णधार शारदानंद तिवारीने तिसर्या व 27 व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
शारदानंद तिवारीने तिसऱयाच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करीत हिंदुस्थानने खाते उघडले. शारदानंदने दुसऱया क्वार्टरमध्ये 27 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवरच गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली. मध्यंतरापर्यंत गोल करण्यात अपयशी ठरलेल्या बेल्जियमने तिसऱया क्वार्टरच्या सुरुवातीलाच पेनल्टी का@र्नरवर गोल करीत आपल्या संघाचे खाते उघडले. चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने सामना संपायला अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना आणखी एका पेनल्टी का@र्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत आपल्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत ही गोल बरोबरीची काsंडी फुटू न शकल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये हिंदुस्थानकडून गुयजोत सिंह, सौरभ आनंद पुशवाह, दिलराज सिंह व मनमीत सिंह यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अचूक गोल करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेल्जियमला शूटआऊटमध्ये दोनच गोल करता आले. गोलरक्षक प्रिन्स दीप सिंहने पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन गोल वाचविल्याने हिंदुस्थानने 4-2 फरकाने बाजी मारली.






















































