दुर्मिळ खगोलीय घटना, चार दिवस शनी, बुध आणि गुरू एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनोखी खगोलीय घटना घडणार आहे. 9 आणि 10 जानेवारी 2021 रोजी सूर्यास्तानंतर अंतराळात शनी, बुध आणि गुरू हे तीनही ग्रह एकत्र दिसणार आहेत. चार दिवस हे ग्रह एकत्र त्रिकोण स्वरूपात अंतराळात दिसतील.

21 डिसेंबर 2020 रोजी गुरू आणि शनिच्या महायुतीने खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी शनी आणि गुरू एकमेकांच्या खूप जवळ आले होते. जगभरातील करोडो लोकांनी हा दुर्मिळ क्षण टिपला होता. याआधी शनी आणि गुरूचे ग्रेट कन्जेक्शन 1623 मध्ये दिसलेले होते. आता शनी आणि गुरू जरी दूर झाले असतील तरी आता बुध त्यांच्यामध्ये आला आहे. ते तिघे चार दिवसांपर्यंत एकत्र त्रिकोण स्वरूपात दिसतील. 10 जानेवारीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होत जातील.