
दालचिनीचा वापर हा आपण आपल्या आहारात अनेकदा करतो. त्यामुळेच दालचिनी हा आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक मानला जातो. दालचिनीचा आपल्या आहाराचा भाग बनवल्याने, आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. दालचिनी केवळ खाण्यासाठी नाही तर, आपल्या केसांसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे. केसांच्या समस्यांवर, दालचिनीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. दालचिनीमध्ये असे घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. केस गळती रोखतात आणि स्प्लिट एंड्स दूर करण्यात देखील महत्त्वाची भूमिका वठवतात.
केसांसाठी दालचिनीचा वापर कसा करायचा?
साहित्य
दालचिनी पावडर: 1 टीस्पून
ऑलिव्ह ऑइल: 4 टेबलस्पून
दालचिनी तेल कसे बनवायचे?
एका पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करा. या गरम तेलात गरम तेलात दालचिनी पावडर मिसळा. चमच्याच्या मदतीने पावडर तेलात मिसळत रहा.
आता हे तेल थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर त्या तेलाने डोक्याला मालिश करा.
Hair Care- केस धुण्याआधी 2 तास मोहरीच्या तेलाने मालिश करा, केसांमध्ये दिसतील हे ‘5’ महत्त्वाचे बदल
केसांसाठी दालचिनीचे फायदे
केस गळती रोखण्यासाठी दालचिनीचा वापर करता येतो. आजकाल, पुरुष असो वा महिला, केस गळतीच्या समस्येने सर्वांनाच त्रास होत आहे. केस गळतीची मुख्य कारणे म्हणजे खाण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि आरोग्य समस्या. दालचिनीच्या मदतीने आपण केसगळतीवर मात करु शकतो. दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड असते. यामुळे केस गळती कमी होते. दालचिनीच्या तेलाने मालिश केल्यानंतर आपले रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्यानंतर केसगळती रोखण्यास खूप मदत होते.