गुन्हेविषयक खटल्यांचे वार्तांकन करताना माध्यमांकडे स्वनियंत्रण हवे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अहमदाबाद

गुन्ह्याशी संबंधित खटल्याच्या बातम्या देताना, या खटल्यांचे वार्तांकन करताना माध्यमांकडे स्वनियंत्रण हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. देसाई यांनी व्यक्त केले. निष्पक्षपाती खटल्याच्या सुनावणीत माध्यमांचा अडथळा येतो का? या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना देसाई म्हणाले, गुन्हय़ाचा तपास करण्यापासून रोखणारा कायदा नाही. या देशात माध्यमस्वातंत्र आहे. ते कमी करायचे नाही. ते कोणीही कमी करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे, पूर्णतः कायदा सुव्यवस्था विरहीत स्वनियमन, स्वनियंत्रण हे वृत्तपत्रे माध्यमांकडे हवे.

summary- justice advises media over crime reporting