न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

माजी न्यायमूर्ती घोष हे सर्वोच्च न्यायालयापूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायामूर्ती होते. ते मानवी हक्कांचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्या अनेक निकालांवेळी मानवी हक्कांच्या संरक्षणाची बाजू घेतली होती. 2017 सालात सेवानिवृत्त झालेले घोष हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य होते.

पिनाकी घोष यांच्यासोबत लोकपाल मधील न्यायिक सदस्य म्हणून न्यायमूर्ती दिलीप बी. भोसले, न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती, न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. तर इतर सदस्य म्हणून दिनेश कुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्र सिंह और डॉक्टर इंद्रजीत प्रसाद गौतम यांना सामिल करण्यात आले आहे.