जस्टीन बीबर अडकला लग्न बंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबर हा त्याची गर्लफ्रेंड मॉडेल हॅले बाल्डविनसोबत लग्नबंधनात अडकला आहे. जस्टीनने शुक्रवारी कोर्टात जाऊन लग्न केले असून लवकरच ते पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत.

शुक्रवारी सकाळी जस्टीन आणि हॅले हे दोघे लग्नाची नोंदणी केली जाते त्या कोर्टात गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याआधी जस्टीन खूप भावनिक झाला होता. या दोघांच्याही घरातील काही मंडळी यावेळी तिथे उपस्थित होती. जस्टीन आणि हॅले लवकरच चर्चमध्ये लग्न करणार असून त्याच्या मित्र मैत्रिणींसाठी जंगी पार्टीचे आयोजन करणार आहेत.

जस्टीनने १० जुलैला त्याच्या व हॅले बाल्डविनच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपुडा करून लवकरच लग्न करणार असल्याची देखील घोषणा केली होती.