
महावितरणच्या महिला संचालकपदी (स्वतंत्र) महापारेषणच्या पुणे परिमंडळातील अधीक्षक अभियंता ज्योती नितीन चिमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योती चिमटे या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील विद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी पदवीधर आहेत. 1998मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात (एमएसईबी) त्या कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाल्या होत्या. त्यानंतर महापारेषण कंपनीत त्यांनी सरळसेवा व बढतीद्वारे विविध पदांवर काम पाहिले. 2017पासून त्या अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत.


























































