अभयारण्यात शिकार केल्या प्रकरणी गोल्फर ज्योती रंधावा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बहराईच

उत्तर प्रदेशात खास वाघांसाठी असलेल्या दुधवा अभयारण्यात हिंस्त्र प्राण्यांची शिकार केल्याच्या आरोपावरून हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावा याला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशात मोतीपूर वन क्षेत्राच्या कटरनिया घाट परिसरात त्याला अटक केली आहे. याच वन क्षेत्राच्या परिसरात त्याने अवैध शिकार केल्याचा आरोप आहे.

हरयाणात नोंदणी केलेली एक मोटार, एक रायफल, वन्य प्राण्यांचे काही अवशेष त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. रंधावा याचा मोतीपूर भागात फार्म हाऊस असून गेल्या तीन दिवसांपासून तो आपल्या मोटारीने या भागात फिरत होता. त्यांच्यासोबत एका इसमालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, 2004 ते 2009 या काळात अधिकृत जागतिक गोल्फ रँकिंगमध्ये पहिल्या टॉप 100 खेळाडूंमध्ये ज्योती रंधावाचा समावेश झालेला आहे. एक खेळाडूच शिकारी बनल्याचे समोर येताच क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.