K Kavitha quits BRS – निलंबनानंतर के. कविता यांची BRS ला सोडचिठ्ठी, आमदारकीचाही राजीनामा

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी के. कविता यांना पक्षातून निलंबित केले होते. निलंबनानंतर के. कविता यांनी बीआरएसला सोडचिठ्ठी देत विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. कविता यांनी बुधवारी विधान परिषदेच्या सभापतींकडे राजीनामा सोपवला.

माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आले. पक्षा कार्यालयातूनच खोटे पसरले जात आहे, असा आरोप करत के. कविता यांनी के. चंद्रशेखर राव यांना आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली. हरीश राव आणि जे. संतोष कुमार यांच्यापासून साधव राहण्याचेही आवाहनही त्यांनी भाऊ रामा राव यांना केले.

हरीश राव आणि संतोष कुमारच्या भ्रष्टाचारामुळेच केसीआर यांच्याविरोधात सीबीआय चौकशी होत असून ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसल्याच्याही त्या म्हणाल्या. हरीश राव आणि अन्य लोक काँग्रेस-भाजपसोबत मिळून बीआरएसचे नुकसान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.