
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्यात पणजी – वास्को मार्गावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज जवळ धावत्या कदंबा बसला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमीक माहिती मिळत असून संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढले असल्याने सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात





























































