
सामना ऑनलाईन । इंदूर
काँग्रेसकडे नेता नाही. त्यामुळे चॉकलेटी चेहऱ्यांवर त्या पक्षाची सारी भिस्त आहे. त्यांच्यातील आत्मविश्वासाचा अभाव उघडा पडला आहे, अशा शब्दांत भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी आज तोफ डागली.
प्रियंका गांधी-वढेरा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी झालेली नियुक्ती आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींच्या नावांचा काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसवाले कधी प्रियंका गांधी-वढेरा यांना आणतात, कोणी अभिनेत्री करिना कपूरला उमेदवारीसाठी आग्रह धरतो, तर कोणी सलमान खानचे नाव पुढे रेटतात, असे विजयवर्गीय म्हणाले.

























































