
यशाचे सूत्रं काय असते असे तुम्हाला वाटते? त्याचा काही फॉर्म्यूला असतो का? काही शॉर्टकट असतो का? तर नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि कसोशीचे प्रयत्न महत्त्वाचे असतात. हेच सांगतेय बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल. काजोलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले असून यशाची ‘त्रिसूत्री’ सांगितली आहे.
कालोजले प्रत्येक फोटोसोबत एक मेसेज शेअर केला आहे. यामध्ये तिने यशाची ‘त्रिसूत्री’ सांगितली आहे. पहिल्या फोटोसोबत काजोलने लिहिले की, यशाची ‘त्रिसूत्री’ – 1. प्रयत्न (Try) प्रत्येकजण काम करत असतो. प्रत्येकाने कुठेतरी सुरुवात करण्याची आवश्यकता असते आणि सर्वांनाच कसरत करावी लागणार आहे.
दुसऱ्या फोटोसोबत काजोलने दुसरी स्टेप सांगितली आहे. 2. अपयश (Failure). पॉझिटिव्हनेस ही अशी भावना आहे जी अपयशाचे महत्व सांगते आणि त्यापासून काय शिकावे हे देखील सांगते. कोणी तरी म्हटलेच आहे ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
View this post on Instagram2. Failure #Life #EverythingWorksEventually #Attitude #PositiveIsAFeeling
तिसऱ्या फोटोसोबत काजोने यशाची तिसरी स्टेप सांगितले आहे. 3. शिका आणि कसोशीने प्रयत्न करा. (Learn and try harder). जोपर्यंत तुम्हाला हवं ते मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. हार मानू नका. यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा.
View this post on Instagram3. Learn and try harder, Repeat till you achieve everything #EverythingWorksEventually



























































