कळंबच्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक, पकडलेले कामगारही उपक्रमांवर खूष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या विळख्याने जगभर थैमान घातल्याने लॉकडाउन काळात जिल्हाबंदीचे आदेश कडक करण्यात आले असून आपल्या गावाकडे जाणाऱ्या मजुरांना क्वारंटाईन करून बंदिस्त करून ठेवण्यात येत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रिलीफ कॅम्पमधे बंदीस्त ठेवण्यात आलेल्या लहान थोर मंडळीना रोग प्रतिकार शक्ती वाढावी, आरोग्याची काळजी घेणयासाठी तसेच तंदुरुस्त राहून मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी पहाटेच्या योगाचे धडे देण्याच्या जिल्हाधीकाऱ्यांच्या उपक्रमाची केंदीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची दखल घेतली. ट्वीट करून जिल्हाधीकाऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम देशभर लागू करण्याचे आवाहन देखील केले आहे.

कोरोना आजाराच्या भीतीने अनेकांनी लॉकडाउन असताना गावाकडचा रस्ता धरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना आहे त्याच ठिकाणी राहण्याचे आवाहन केले असून जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. परंतु भितीने लोक मिळेल त्या वाहनाने चालत आपले गाव जवळ करू लागले आहेत. जालनातील चोवीस उसतोड मजुरांना कळंबमधे पकडून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले असून देवडा फाउंडेशनद्वारे त्यांच्या भोजनाची सोय केली आहे. जिल्हाधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्यामुळे कामगार देखील त्यांचे कौतुक करत आहेत.