कळमनुरी मतदारसंघातील सर्वच गाव डांबरी व पक्क्या रस्त्यांनी जोडणार – संतोष बांगर

557

हिंगोली जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या 25-15 योजनेंतर्गत रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव डांबरी व पक्क्या रस्त्यांनी जोडणार असून पुढच्या पाच वर्षात सर्वच वाडी-तांडे, गावे रस्त्यांनी जोडली जातील, यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर हजारोच्या संख्येने मतदान करुन मला सेवेची संधी द्या, असे आवाहन कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केले आहे.

महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील देवाळा, लाख, मेथा, आसोंदा, निशाणा, सुरवाडी, धारखेडा, पिंपरी, सुरेगाव, अंजनवाडा, पिंपरी कुंडकर, हिवरा, पिंपळा, बोरजा, जडगाव, येहळेगाव सो. या गावात भेटी देवुन नागरिकांशी संवाद साधत प्रचार केला. शिवसेना-भाजपा महायुती सरकारच्या पाच वर्षातील कामाचा लेखा-जोखा मांडतांनाच शिवसेनेच्या वतीने शेतकरी व जनहितासाठी केलेल्या कामाचीही माहिती बांगर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्य फकीरा मुंडे, विठ्ठल चौतमल, भाजपचे जेष्ठ नेते सुरजितसिंग ठाकुर, अनिल देशमुख, बंडु चोंढेकर, राजु पाटील, त्र्यंबक लोंढे आदींसह शिवसेना व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वारंगा फाटा येथील श्री भवानी माता मंदिर येथे जाऊन संतोष बांगर यांनी आशीर्वाद घेतले. यासोबतच बाळापुर परिसरातील पावणमारीसह विविध गावांना भेटी दिल्या. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, उपसभापती गोपु पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या