राष्ट्रवादीच काळे यांचे ‘कल्याण’ करणार, कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणराव भाजपमध्ये गेले. मात्र, तिथे त्यांचे कल्याण झाले नाही; दोन वर्षांत पक्ष बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काळे राष्ट्रवादीत आल्यामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे; पण भगीरथ भालके यांच्या मताधिक्यातही अधिकची भर पडण्यास मदत होणार आहे. कल्याणराव काळे यांचे राष्ट्रवादीच ‘कल्याण’ करणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपनेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार करणार आहे.

विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रक चुकला होता, अशी कबुली कल्याणराव काळे यांनी भाषणात दिली. खासदार शरद पवार यांची ताकद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार असून, यापुढे शरद पवार जे सांगतील त्या पद्धतीने काम करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.