द्रमुकशी फारकत घेतली तर काँग्रेसशी युती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा आपला पक्ष आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यास तयार आहे, पण यासाठी काँग्रेसला द्रमुकबरोबर असलेली युती तोडावी लागेल, असे एमएनएमचे सर्वेसर्वा अभिनेते कमल हसन यांनी म्हटले आहे. एमएनएमचा उद्देश भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणे हा असून आमचा पक्ष कधीही भ्रष्ट पक्षाशी हातमिळवणी करणार नाही. द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी आहेत. तामीळनाडूमधून या दोन्ही पक्षांना हटविण्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे हसन यांनी म्हटले आहे. द्रमुक-काँग्रेस ही युती तुटणार असेल तर आमचा पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी करील, असे हसन यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.