केआरके म्हणतो ‘मीच बॉलिवूडचा नंबर 1 समीक्षक’, नेटकऱ्यांनी झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रपटांचं अत्यंत भयंकर पद्धतीचं समीक्षण करून तमाम बॉलिवूडकरांना वैताग देण्याचं काम कमाल राशिद खान नित्यनेमाने करत असतो. यावेळीही त्याने स्वतःची स्तुती करत मीच बॉलिवूडचा नंबर एकचा समीक्षक असल्याचा दावा केला आहे. अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण देओल याने एअरपोर्टवर मला ओळख दाखवली नाही. त्याला भलताच तोरा आहे, असं ट्वीट केआरकेने केलं आहे.

केआरकेने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने करणवर टीका केली आहे. आज मी करण देओलला विमानतळावर पाहिलं. मी त्याच्यापेक्षा मोठा असूनही तो मला हॅलो देखील म्हणाला नाही. मी फक्त मोठाच नाही, तर बॉलिवूडमधला नंबर 1चा समीक्षक आहे. मी एक ब्रँड आहे. करण फक्त वाईट अभिनेताच नाही तर त्याला खूप तोराही आहे. तो बॉलिवूडमध्ये कधीच यशस्वी होणार नाही, अस ट्वीट केआरकेने केलं आहे.

आता त्याच्या या ट्वीटवर गप्प बसतील ते नेटकरी कसले. त्यांनी केआरेकची हुर्यो उडवायला सुरुवात केली. करणला तू विमानतळावरचा पोर्टर (हमाल) वाटला असशील इथपासून ते ढाई किलोका हाथपर्यंत नेटकऱ्यांनी त्याची यथेच्छ खिल्ली उडवली आहे.