
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या आता कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत. हॅरिस म्हणाल्या की, अमेरिकेची राजकीय व्यवस्था बिघडलीय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मी सक्षम नाही.
कमला हॅरिस पुढे म्हणाल्या की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जनतेची सेवा केली आहे. त्या म्हणाल्या, मी राज्यपाल होण्याचा खूप विचार केला. मला माझे राज्य कॅलिफोर्निया आवडते, पण आता मला वाटते की, व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची माझी क्षमता कमी झाली आहे. दरम्यान, कमला हॅरिस यांचे ‘107 डेज’ हे नवीन पुस्तक २३ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचाराच्या 107 दिवसांच्या अनुभव लिहिला आहे.































































