विकास कामातून दिसला पाहिजे, जाहिरातीतून नाही! कमलनाथ यांचा मोदींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kamalmnath-cm-mp

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशात सत्ता परिवर्तन झालं, विकास झाला हे जनतेला सरकारने केलेल्या कामातून जाणवलं पाहिजे, जाहिरातीतून नाही, असा सणसणीत टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीवेळी त्यांनी आपल्या सरकारची भूमिका, नव्या वर्षातील आव्हानं स्पष्ट केली.

मध्य प्रदेशचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून आमचे प्रयत्न आहेत, असे सांगतानाच मी कोणतीही घोषणा करू इच्छित नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील लोकांना माझ्या सरकारचे कार्य दिसावे, हीच माझी इच्छा आहे. पुढे अनेक योजना, धोरणं आणि परिवर्तन पाहायला मिळेलच, असंही ते म्हणाले. मंत्री आणि आमदारांनी घोषणा करण्याचे दिवस आता संपले असून त्या-त्या अधिकारी आणि कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने घोषणांना पूर्णत्वास नेण्यास कारणीभूत असतात. तेव्हा त्यांना कार्यन्वित करण्याचं आमचं काम असंही ते म्हणाले.