
मुंबईत कांदिवली परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला चढवून त्यांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला असून आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय, अशी संतप्त टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत या घटनेचा व्हिडीओही शेअर केला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला असून आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय. पोलिसांना मारहाण करण्याचा कांदीवलीतील हा प्रकारही याच पठडीतला दिसतोय. पण अशा पद्धतीने पोलिसांचा वचक कमी होत गेला तर, गल्लोगल्लीत गुंडांचा सुळसुळाट होऊन सामान्य माणसाला श्वास घेणंही कठीण होईल. या गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक पोलिसांमध्ये आहे. पण त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यावी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी दिला.
निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला असून आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय. पोलिसांना मारहाण करण्याचा कांदीवलीतील हा प्रकारही याच पठडीतला दिसतोय, पण अशा पद्धतीने पोलिसांचा वचक कमी होत गेला… pic.twitter.com/jSFIYSqQOE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 15, 2025
कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये रविवारी रात्री नऊच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती. याच हाणामारीला सोडवून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या टोळीकडून हल्ला करण्यात आला. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


























































