कांदिवलीत रस्ता खचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

मुंबईतील वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईच्या पोटात विविध प्रकारच्या केबल्ससह सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे अक्षरश: जाळे पसरले आहे. त्यामुळे मुंबईच्या पोटात सातत्याने विविध प्रकारची उलथापालत होत असते, अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार घडतात. कांदिवलीच्या चारकोप मार्केटमध्येही सांडपाण्याच्या पाण्याचा वारंवार निचरा होऊन रस्त्याच्या मधोमध भले मोठे भगदाड पडले. सुरक्षेची काळजी म्हणून त्याच्या भोवती पत्र्याचे कुंपण तयार करण्यात आले आहे.